Share

लवकरात लवकर मेगाभरती घ्या नाहीतर मेगा आंदोलन करू; ओबीसी समाज आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. यानंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली गेली आहे. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सारासार विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कारण त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तर, जाहीर केलेल्या मेगाभरती देखील रखडल्या आहेत.

त्यामुळे, ओबीसी समाज देखील आरक्षण अबाधित राहावं, मेगा भरतीसह स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेतल्या जाव्यात यासाठी रस्त्यावर उतरला आहे. ‘राज्यामध्ये ७२ हजार पदांची मेगाभरती थांबवली आहे. यासोबत साडेबारा हजार पदांची पोलीस भरती, पाच हजार पदांची महावितरणमधील विद्युत सहाय्य्यकांची भरती अशा भरत्या थांबवलेल्या आहेत.’ असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलं होतं.

यासोबतच ‘एमपीएससी परीक्षा थांबवली आहे, गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेचा या जूनमध्ये निकाल लागला आहे. जवळपास ४१३ पदं असून त्यात मराठा समाजाच्या देखील ४८ पदं आहेत. बाकीचे ३६५ पदं जी आहेत ते SC, ST, धनगर आणि ओबीसी समाजाचे विद्यार्थी आहेत. त्यामध्ये डीवायएसपी, आरटीओ, कलेक्टर, तहसीलदार अशी महत्वाची पदं असून या नियुक्त्या का थांबवल्या आहेत?’ असा सवाल शेंडगे यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता.

आता त्यांनी मेगाभरती लवकरात लवकर व्हावी यासाठी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत आज ओबीसी समाजाची पहिली राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ओबीसी व भटक्या विमुक्त समाजातील प्रमुख नेते हजर होते. राज्य सरकारने लवकरात लवकर मेगाभरतीची प्रक्रिया सुरु करावी. अन्यथा ओबीसी समाजाकडून मेगा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला. त्यासाठी येत्या 20 तारखेला ओबीसी समाजाकडून राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा देखील शेंडगेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!