🕒 1 min read
शिर्डी : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
नवीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनच्या प्रतिनिधींमध्ये ३० डिसेंबरला झालेल्या चर्चेत 4 पैकी 2 मुद्द्यांवर दोन्ही बाजूंची सहमती झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काल ही माहिती दिली. यामुळे आगामी काळात या आंदोलनाचा तिढा सुटेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आलेले शेतक-यांसाठीचे तीनही कायदे शेतक-यांच्या हिताचे आहेत. ज्यांचा विरोध आहे त्यांचे समाधानही होईल, यासाठी चर्चा सुरू आहे. देशातील शेतकरी मोदींच्या मागे उभे आहेत, जे शेतकरी समजले नाही त्यांनाही समजेल आणि नविन वर्ष चांगले जाईल, असे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शिर्डीत व्यक्त केले.
मुख्यमंत्री चव्हाण हे साईदर्शनासाठी शिर्डीत आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०२० वर्ष संकट, दु:ख व कष्टाने भरलेले होते. कोरोनाने अर्थव्यवस्था कोलमडली, अनेकांचे प्राण गेले. या वर्षाला निरोप देतांनाच कोरोना या देशातून व जगातून जावो. अर्थव्यवस्था सुरळीत होवो. सर्वांचे कल्याण होवो यासाठी आपण बाबांना साकडे घातल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे; दगडूशेठ गणपतीला भाविकांचं साकडं
- ‘नवीन वर्ष तुमच्याशिवाय पण…’ इरफान खानच्या मुलाची भावुक पोस्ट
- भारताचे दिग्गज हॉकीपटू मायकल किंडो यांनी घेतला अखेरचा श्वास
- साईनगरीत भाविकांकडून बाबांचे दर्शन घेऊन नव्या वर्षाचे स्वागत
- कसोटी सामन्यात उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
