🕒 1 min read
भुवनेश्वर: क्रीडा विश्वातून एक दुखत बातमी आली आहे.भारताचे दिग्गज हॉकीपटू मायकल किंडो यांचे आज निधन झाले. ओडिशा राज्यात राहणारे किंडो यांनी १९७२च्या समर ऑलम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक मिळवले होते. वयाच्या ७३व्या वर्षी राऊरकेलामधील इसपट सामान्य रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
हॉकी इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने याबाबत माहिती दिली. आपल्या देशाचे माजी हॉकीपटू, आणि १९७५च्या विश्वचषकातील विजेते मायकेल किंडो यांचे दुःखद निधन झाले आहे. अशा आशयाचे ट्विट करत, या दुःखद प्रसंगी आपण त्यांच्या परिवारासोबत असल्याचे हॉकी इंडियाने म्हटले आहे.
Hockey India express their deepest condolences on the sad demise of former India Hockey Player, 1972 Olympic Medalist and 1975 World Cup winner, the Hockey legend Michael Kindo.#IndiaKaGame @IndiaSports @Media_SAI @sports_odisha @CMO_Odishahttps://t.co/A6H4145COo
— Hockey India (@TheHockeyIndia) January 1, 2021
यासोबतच, ओडिशाच्या क्रीडा विभागानेही आपल्या ट्विटरवरुन किंडो यांच्या जाण्याबाबत दुःख व्यक्त केले. भारताचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणाऱ्या या पहिल्या आदिवासी हॉकी खेळाडूस नमन, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
मायकेल किंडो यांनी १९७२च्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये हॉकीत कांस्यपदक मिळवले होते. तसेच विविध विश्वचषकांमध्ये त्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक मिळवले आहे. १९७५ला जेव्हा भारताने हॉकी विश्वचषक जिंकला होता, तेव्हा त्या विजेत्या संघामध्ये मायकेल यांचाही समावेश होता.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे; दगडूशेठ गणपतीला भाविकांचं साकडं
- ‘नवीन वर्ष तुमच्याशिवाय पण…’ इरफान खानच्या मुलाची भावुक पोस्ट
- नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्तीच सुरु, फडणवीसांचा टोला
- साईनगरीत भाविकांकडून बाबांचे दर्शन घेऊन नव्या वर्षाचे स्वागत
- कसोटी सामन्यात उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
