शिर्डी: शिर्डी येथील साईबाबा मंदिरात २८ , २९ व ३० डिसेंबरला दर्शनार्थी भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे .त्यातच नववर्षाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी साई मंदिर हे ३१ डिसेंबरला रात्रभर खुले ठेवण्यात येत असते. मात्र यंदा संस्थान कोविडच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेते ? याकडे साईभक्तांचे लक्ष लागले होते. अखेर ३१ डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तसेच मध्यरात्री साई दरबारात लाखो भाविकांनी हजेरी लावली होती यावेळी गुरुवारी मध्यरात्री रात्री 12 वाजेच्या सुमारास भाविकांनी साईं मंदिर परिसरात साईंचे दर्शन घेऊन मोठ्या उत्साहात नव वर्षाचे स्वागत केले.सरत्या वर्षाला निरोप देत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात येत होती.
भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश केल्याच प्रकर्षाने जाणवले. तसेच ज्यांना मंदिरात प्रवेश करता आला नाही, त्यांनी साई समाधी मंदिराच्या कळसाच दर्शन घेत धन्यता मानली. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आल्याने शेकडो भाविकांना रात्रीच साईंचे दर्शन घेता आले.
साईनगरीत नवीन वर्षाच स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. तासनतास रांगेत उभे राहात भाविकांनी नवीन वर्षात कोरोना नष्ट होवो, असे साकडे साईबाबांना घातले. साईनामाचा जयघोष करत भक्तांनी फटाक्यांची आतषबाजी केली. मिठाई वाटून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच स्वागत करत भाविकांनी एकमेकांना अलिंगन देत शुभेच्छाही दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- नवीन वर्षात मीडियापासून लांब राहण्यासाठी दिपीकाने सोशल अकाऊंटवरील पोस्ट केल्या डिलीट
- धनंजय मुंडेंचा धडाकेबाज निर्णय अन् ‘त्या’ दोन्ही सावित्रीच्या लेकी आता शिकणार थेट परदेशात !
- रामदास आठवलेंनी कवितेतून दिल्या नवीन वर्षाच्या हटके शुभेच्छा !
- ‘वंडर वुमन’ची बिलकीस दादीला भेटण्याची इच्छा
- चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
