पुणे : नवीन वर्षाची सुरवात चांगल्या कामाने व्हावी म्हणून पुण्यातील नागरिकांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन करण्यासाठी गर्दी केली होती.
दरवर्षी वर्षाची सुरुवात अनेक जण दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन करत असतात यंदा मात्र covid-19 च्या प्रादुर्भावामुळे शासकीय नियम पाळत भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले सकाळी सहा वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती .
दरम्यान,मास्क शिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता दरवर्षीपेक्षा मात्र यंदा भाविकांची गर्दी कमी होती तरीही दिवसभरात हजारो भाविकांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. नागरिकही सर्व नियमांचे पालन करताना दिसले.
शासकीय नियमानुसार मंदिर ट्रस्टने सर्व तयारी केली होती कोणालाही हार नारळ मंदिरात नेण्यास परवानगी देण्यात आली नाही. यावेळी भाविकांनी कोरोनाचे संकट दूर व्हावे असं साकडं गणपती बाप्पा ला घातलं.
महत्वाच्या बातम्या
- नवीन वर्ष आरोग्य क्षेत्रातल्या आव्हानांवर मात करणारं असेल : मोदी
- पुण्यातील आयटी नगर परिसरात गव्याचा वावर
- सुनील गावसकर यांच्या मते, सिडनी कसोटीत रोहितसोबत ‘या’ खेळाडूने करावी ओपनिंग
- नूतन वर्षाचे स्वागत ‘या’ गोष्टींचा अंगीकार करून नव्या उत्साहाने करू
- शपथ घेण्याआधीच नवनिर्वाचित खासदाराचा झाला कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू


