Share

कसोटी सामन्यात उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. यासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-१ ची बरोबरी साधली आहे. सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्याच्या पोटरीचे स्नायू ताणल्या गेल्याने त्याने दुसऱ्या डावात चौथे षटक टाकत असतानाचा मैदान सोडले होते. सामन्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये उमेशची दुखापत गंभीर असल्याचे आढळून आले. त्यामुळे तो उर्वरित मालिकेला मुकणार आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी तंदुरुस्त होण्यासाठी बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमासाठी जाणार आहे.

मात्र, त्याच्या जागी आता भारताच्या निवड समितीने डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनचा कसोटी संघात समावेश केला आहे. याआधी बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी शार्दुल ठाकूरचा मोहम्मद शमीच्या जागी संघात समावेश करण्यात आला होता. नटराजन आणि शार्दुल या दोघांचाही मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश होता. त्यानंतर कसोटी मालिकेसाठी सरावाचे गोलंदाज म्हणून ते ऑस्ट्रेलियातच थांबले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!