Share

पुण्यातील आयटी नगर परिसरात गव्याचा वावर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे बावधननंतर आता आयटी नगरी असलेल्या माणगावात गव्याचा प्रवेश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नववर्षाच्या भल्या पहाटेच गव्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली.

माण गावातील राक्षे वस्तीवर पहाटे साडेपाचला मुळा नदीकडून गवा आल्याचे जयवंत राक्षे यांनी पाहिले. भल्या पहाटे ते मॉर्निंग वॉकला चालले होते. यावेळी ते फोटो घेण्यासाठी पुढे आले असता गवा त्यांच्या अंगावर धावून आला त्यांनी तत्काळ पळ काढून घरात गेले.

गव्याचा माणगावातील आगमनाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तो ठाकर वस्ती किंवा मारणे वस्तीच्या दिशेने गेला असल्याचे लोकांनी पाहिल्याने तो शेतातील उसात लपून बसला असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, ९ डिसेंबर रोजी पुण्यात कोथरूडच्या परिसरात एक गवा शिरला होता. लोकांनी त्याला बघायला प्रचंड गर्दी केली. मात्र गवा गर्दीला पाहून बिथरला आणि गवा जीवानिशी गेला. त्यानंतरही आठवडाभरापूर्वी बावधनच्या एका तलावालगत गवा आढळून आला. त्याला मात्र वनविभागानं यशस्वीपणे कुठलीही इजा न होऊ देता त्याच्या अधिवासात पाठवलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!