Share

शपथ घेण्याआधीच नवनिर्वाचित खासदाराचा झाला कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

वॉशिंग्टन –जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही देशामध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे.

याच दरम्यान अमेरिकेतील नवनिर्वाचित खासदाराला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. रविवारी ते शपथ घेणार होते. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला आहे.

ल्यूक जोशुआ लेटलो असं रिपब्लिकन खासदाराचं नाव होतं. 18 डिसेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

ल्यूक जोशुआ लेटलो यांनी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 41 व्या वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यामागे त्यांची पत्नी जुलिया बरनहिल लेटलो आणि दोन लहान मुलं आहेत.

दरम्यान, एका बाजूला हि दुर्दैवी घटना घडली असताना अमेरिकेच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेला जनुकीय रचना बदलेला कोरोना विषाणू आता अमेरिकेतही आढळून आला आहे. कोलोरॅडो राज्यातल्या एका 20 वर्षीय युवकामध्ये या नव्या प्रकारातला विषाणू आढळून आला आहे.

या युवकानं परदेश प्रवासही केलेला नव्हता; त्याला आता विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!