🕒 1 min read
नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष जनतेला आरोग्यदायी, आनंदाचं आणि समृद्धीचं जावो, अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
२०२० हे वर्ष आरोग्य क्षेत्रातल्या आव्हानांचं होतं तर येणारं नवीन वर्ष या आव्हानांवर मात करणारं असेल असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. गुजरातमधल्या राजकोट इथ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पायाभरणी समारंभात ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते.
या आधी जोपर्यंत लस नाही तोपर्यंत नियमांमध्ये कसूर नाही असा नारा दिला होता; मात्र आता "लस आणि दक्षता दोन्हीही अर्थात दवाई भी कडाई भी असा नारा पंतप्रधानांनी दिला.
कोरोनाच्या संकट काळात ज्या प्रमाणे भारतानं जगातल्या अनेक देशांना मदत करत महत्त्वाची भूमिका बजावली; त्याच प्रमाणे भारताचा लसीकरणाचा व्यापक अनुभवही जगाला उपयुक्त ठरेल असं पंतप्रधान म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- नववर्षाच्या सुरुवातीलाच जग कोरोनामुक्त होवो; सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकरच मिळो – अजित पवार
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना
- औरंगाबादमध्ये आता काँग्रेसचा महापौर बसवा; शिवसेनेच्या सत्तेला थोरातांचं थेट आव्हान
- पुणेकरांसाठी खुशखबर : PMPML च्या ताफ्यात दाखल होणार नव्या १५० ई-बसेस!
- ‘सोनिया गांधींचे नामांतर चालते मग औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही ? ‘
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
