🕒 1 min read
औरंगाबाद : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
तर नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या मागणीमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
औरंगाबाद, कोल्हापूर या महापालिकांनी निवडणूक जवळ आली आहे. यासाठी सर्वच पक्ष आपली कंबर कस्त असून काँग्रेसने या दोन्ही महापालिकांमध्ये स्वबळाची नारा दिला आहे. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांनी काँग्रेसचे नेते व मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन स्वबळावर लढण्याची मागणी केली होती.
आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा देत महापौर काँग्रेसचाच बनवण्याची गर्जना केली. यामुळे त्यांनी थेट शिवसेनेलाच ललकारल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचीच सत्ता औरंगाबादमध्ये आहे. महापौरपद देखील शिवसेनेकडे आहे. मात्र, आता थोरातांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडू शकते.
‘औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा करण्यासाठी कामाला लागा’ असे आदेश बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. पक्षातील मतभेद झटकून सर्व ११५ जागा लढवण्याची तयारी करा. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरत असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद संपवून जोमाने कामाला लागावे. पक्षहित हे सर्वात महत्वाचे आहे. कसल्याही प्रकारची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही.’ असं देखील त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे.
औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा करण्यासाठी कामाला लागा!: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात.
मतभेद झटकून सर्व ११५ जागा लढवण्याची तयारी करा. pic.twitter.com/Ovij705w6a
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 31, 2020
‘औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा होईल यासाठी कामाला लागा, पक्ष सर्वतोपरी मदत करेल,’महाविकास आघाडी म्हणून पहिले ध्येय हे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हे आहे. निवडणुकीत आघाडीबाबत योग्य त्यावेळी निर्णय होईल. पण तुमची मते विचारात घेतली जातील. असे असले तरी सर्व जागा लढण्याची तयारी ठेवा आणि औरंगाबादला पुन्हा एकदा काँग्रेसचा गड बनवा. ‘ असं देखील यावेळी थोरात म्हणाले.
औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा होईल यासाठी कामाला लागा, पक्ष सर्वतोपरी मदत करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 31, 2020
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : CBSE १० वी, १२ वी च्या परीक्षांची तारीख ठरली
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना
- ‘…अन्यथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ऑफिस फोडण्यासाठी रयत क्रांती संघटना मागे-पुढे पाहणार नाही’
- मी रात्री ११ वाजता तिच्या घरी पोहोचलो आणि राहिलो तर? युवकाच्या या प्रश्नाला मुंबई पोलिसांचं सडेतोड उत्तर
- खबरदार! शहराबाहेर जात असाल तर उद्या संचारबंदी संपल्यानंतरच परत या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
