🕒 1 min read
शिर्डी:- शिर्डी येथील साईबाबा मंदिरात २८, २९ व ३० डिसेंबरला दर्शनार्थी भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे .त्यातच नववर्षाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी साई मंदिर हे ३१ डिसेंबरला रात्रभर खुले ठेवण्यात येत असते. मात्र यंदा संस्थान कोविडच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेते ? याकडे साईभक्तांचे लक्ष लागले होते. अखेर ३१ डिसेंबरला म्हणजे आज साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.
दरम्यान, चंडीगढ येथील तृतीयपंथी (किन्नर) समाजबांधवांच्या मेळ्याने काल साईबाबांच्या झोळीत तब्बल 11 लाखांचे दान टाकले. त्या बदल्यात साई संस्थानने देऊ केलेली मोफत व्हीआयपी साई दर्शनाची सुविधाही नम्रपणे नाकारली. दर्शनबारीतील रांगेत उभे राहूनच त्यांनी साई समाधीवर आपला माथा टेकविणे पसंत केले.
किन्नर समाज दान मागून चरितार्थ चालवितात. साईबाबांच्या दरबारात मात्र काल नेमके उलटे चित्र पाहायला मिळाले. या समाजबांधवांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान टाकले. दानपेटीत जमा होणारी दक्षिणा सामान्य भाविकांच्या सुविधांसाठी खर्च करा, असा संदेश त्यांनी यानिमित्ताने दिला.
अनलॉकनंतर राज्यातील मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास साडे तीन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्वाचा निर्णय; परीक्षा देण्यासाठीच्या नव्या मर्यादा केल्या जाहीर
- महेबूब शेख यांना नाहक बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र – राष्ट्रवादी
- सुप्रियाताई-रूपालीताई पिडीतेच्या बाजुने उभ्या राहणार की राष्ट्रवादीच्या आरोपी कार्यकर्त्यांच्या बाजुने ?
- सय्यद मुश्ताक अली टी-२० : पुणेकर राहुल त्रिपाठीच्या खांद्यावर महाराष्ट्राची धुरा
- भावा कसं… वजनात ! : ऋषभ पंतचं मॅथ्यू वेडला जबराट प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
