🕒 1 min read
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील काही शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीने दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. नुकतंच ते पुन्हा महाराष्ट्रात परतले आहेत. राज्यात आल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, प्रहार आणि समविचारी संघटनांनी मुंबईत थेट अंबानींच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चामध्ये ते सामील झाले.
दरम्यान, त्यांच्या दिल्लीतील आंदोलनातील सहभागावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे. ‘मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाही तर आंदोलन करा. मी मुख्यमंत्री असतो तर राजीनामा मागितला असता,’ असा प्रहार आंबेडकरांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेतून केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : CBSE बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या परीक्षांबाबत केंद्र सरकारने केली महत्वाची घोषणा
- नितेश राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?- संजय राऊत
- ‘सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला त्यांच्यामुळे फायदा तरी कुठे झाला?’
- ‘अजून २५ आमदार असते तर उद्धव ठाकरे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असते’
- युवकांच्या स्टार्ट-अपसाठी राज्य सरकारचा पुढाकार; तब्बल ‘इतक्या’ लाखांचं देणार अर्थसहाय्य


