🕒 1 min read
मुंबई : गेल्या ५-६ वर्षात देशातील तरुणाईला फक्त नोकरदार म्हणून नाही तर नोकऱ्या पुरवणारे स्वावलंबी उद्योजक होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉ. अब्दुल कलाम सर यांच्या व्हिजनमधील भारत बनवण्यासाठी तरुणाईची ईच्छाशक्ती व पुढाकार अमूल्य आहे.
त्यामुळेच, भारताला स्वयंसिद्ध आणि महासत्ता बनवण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारने देखील पुढाकार घेतल्याचं दिसून आलं. ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ ‘मेक इन महाराष्ट्र’ ची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेमुळे नवनव्या कंपन्या उभारण्यासोबतच रोजगार उपलब्ध करण्याचा हेतू देखील होता. त्यामुळेच गेल्या काही वर्षात अर्थसंकल्पात देखील मध्यम व लघु उद्योगांसाठी खास आर्थिक तरतूद करण्यात येत आहे.
आता, महाराष्ट्र सरकारने स्टार्ट-अपसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. स्टार्टअपमध्ये गुणवत्ता व नाविन्य असूनही अनेक होतकरु तरूण मोठ्या खर्चाअभावी पेटंटस् मिळवू शकत नाहीत. अशा तरुणांच्या स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची घोषणा कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी आज केली आहे.
पहिल्या टप्प्यात साधारण १२५ ते १५० स्टार्टअप्सना २ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही मंत्री मलिक यांनी सांगितले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात साधारण १२५ ते १५० स्टार्टअप्सना २ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही मंत्री ना. @nawabmalikncp यांनी सांगितले.@CMOMaharashtra #PressConference pic.twitter.com/y9FMTN6WTK
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 22, 2020
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : CBSE बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या परीक्षांबाबत केंद्र सरकारने केली महत्वाची घोषणा
- नितेश राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?- संजय राऊत
- ‘सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला त्यांच्यामुळे फायदा तरी कुठे झाला?’
- ‘अजून २५ आमदार असते तर उद्धव ठाकरे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असते’
- एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा : आशिष शेलार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

