🕒 1 min read
मुंबई:- गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या २६ जानेवारी रोजी होणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच या विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी झाल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेतून कुणी केलेली नाही तर ही मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नितेश राणे यांनी आधी ट्वीटद्वारे आणि नंतर प्रत्यक्ष माध्यमांशी बोलतानाही या मागणीचा पुनरूच्चार केला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे लोक नाव घेतात त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तरी आहे का? याचा स्वत: विचार करावा, आत्मपरीक्षण करावं, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी नितेश राणे यांना लगावला आहे.
दरम्यान, ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला. त्यांनी चिपी विमानतळाच्या नामकरणाची चिंता करू नये. तसेच बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार गद्दारांना नाही अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राऊतांची वाचाळगीरी आणि बच्चू कडू यांची विरुगिरी हा ठाकरे सरकारचा प्रायोजित कार्यक्रम’
- घाबरू नका ! कोरोनाचा नवा प्रकार अनियंत्रित झालेला नाही; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
- ‘पहिले मंदिर फिर सरकार’असे बोलणाऱ्यांची भाषा आता सरकार आल्यावर बदललीय’
- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे : राष्ट्रवादी
- एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा : आशिष शेलार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

