🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रदूरभाव झाल्याने सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक क्षेत्रास देखील यामुळे अनेक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या बोर्डांच्या परीक्षांचे वेध लागण्यास आता सुरुवात झाली आहे.
अशातच, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकार अधिक सतर्क झालं आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी वर्तवलेल्या कोरोना लाटेचा अंदाज देखील केंद्राने येत्या काळातील नियोजनासाठी लक्षात घेतला आहे. भारतात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून केंद्राने पावले उचलले आहेत.
त्यामुळेच CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबतही केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान, CBSE बोर्डाकडून ३ डिसेंबर रोजी, ‘2021च्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन नाही तर लेखी परीक्षा घेण्यात येतील. याबाबत अद्याप चर्चा सुरू असून बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच त्याही तारखा जाहीर केल्या जातील,’ असं स्पष्ट केलं होतं. आता, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं समजत असून पुढील नियोजन अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.
आचार्य देवो भव: Interacting with teachers on upcoming board exams. #EducationMinisterGoesLive @EduMinOfIndia @SanjayDhotreMP @PIB_India @MIB_India @DDNewslive https://t.co/SSNzSkkV4f
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) December 22, 2020
महत्वाच्या बातम्या
- राऊतांची वाचाळगीरी आणि बच्चू कडू यांची विरुगिरी हा ठाकरे सरकारचा प्रायोजित कार्यक्रम’
- नितेश राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?- संजय राऊत
- ‘सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला त्यांच्यामुळे फायदा तरी कुठे झाला?’
- ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार? पडळकरांनी दाखल केलेल्या ‘त्या’ याचिकेचा ७ जानेवारीला निकाल!
- एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा : आशिष शेलार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

