मुंबई : नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची अखेर घरवापसी झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी काल शिवसेनेचं शिवबंधन सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
सानप यांच्या प्रवेशामुळे भाजपला लागलेली गळती थांबून पुन्हा भरती सुरु होईल असा विश्वास फडणवीसांनी काल व्यक्त केला होता. दरम्यान, आज शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकारांशी आज संवाद साधताना त्यांच्या भाजपवासी होण्यावर देखील भाष्य केलं.
सानप यांच्या जाण्याने शिवसेनेचे नुकसान झाले का, असा प्रश्न पत्रकार प्रतिनिधींनी राऊतांना केला असता त्यांनी क्षणार्धातच, ‘बाळासाहेब सानप यांच्या येण्याने शिवसेनेला कोणताही फायदा झाला नव्हता. त्यामुळे नुकसानीचा प्रश्नच नाही,’ असं प्रत्युत्तर देत सानप यांच्या भाजप प्रवेशाची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, ‘नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे तिथून भविष्यात आपला खासदार तिथून निवडून येणार आहे. पुढील काही काळात अनेक आमदार आणि नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पण काही लोकं उगाच वावड्या उठवत असतात की, भाजपचे नेते आमच्याकडे येणार आहे. पण, मुळात त्यांच्या पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी ते अशा पुंग्या सोडत असतात. पण, त्यात काहीही तथ्य नाही. आमचे सर्व आमदार एकाच ठिकाणी आहे’ असा टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राऊतांची वाचाळगीरी आणि बच्चू कडू यांची विरुगिरी हा ठाकरे सरकारचा प्रायोजित कार्यक्रम’
- नितेश राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?- संजय राऊत
- लवकरचं उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार- संजय राऊत
- ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार? पडळकरांनी दाखल केलेल्या ‘त्या’ याचिकेचा ७ जानेवारीला निकाल!
- एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा : आशिष शेलार


