मुंबई : आज शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. यावर देखील त्यांनी प्रत्युत्तर देताना लवकरच शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होतील असं भाकीत वर्तवलं आहे.
देशातील कोणत्याही गोष्टींवर टीका करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. भाजपचे काही लोक त्यात आघाडीवर असतात, अशा लोकांना भारतरत्न पुरस्कारच दिला पाहिजे अशी कोपरखळी त्यांनी मारली. एवढंच नाही तर, आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. ‘शिवसेनेकडे सध्या 56 आमदार असल्यामुळे उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, 25 अजून असते तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असते…’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
शिवसेनेकडे सध्या 56 आमदार असल्यामुळे उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, 25 अजून असते तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असते…???? https://t.co/iwu1emtV31
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 22, 2020
दरम्यान, ‘नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या जाण्याने शिवसेनेचे नुकसान झाले का, असा प्रश्न पत्रकार प्रतिनिधींनी राऊतांना केला असता त्यांनी क्षणार्धातच, ‘बाळासाहेब सानप यांच्या येण्याने शिवसेनेला कोणताही फायदा झाला नव्हता. त्यामुळे नुकसानीचा प्रश्नच नाही,’ असं प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : CBSE बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या परीक्षांबाबत केंद्र सरकारने केली महत्वाची घोषणा
- नितेश राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?- संजय राऊत
- ‘सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला त्यांच्यामुळे फायदा तरी कुठे झाला?’
- ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार? पडळकरांनी दाखल केलेल्या ‘त्या’ याचिकेचा ७ जानेवारीला निकाल!
- एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा : आशिष शेलार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

