Share

नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचा साक्षीदार असेल : नरेंद्र मोदी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसद मार्ग येथील संसदेच्या नवीन इमारतीचा पायाभरणी सोहळा पार पडला आहे. जुन्या संसद भवनात जागेची कमतरता आणि भविष्याच्या दृष्टीने मर्यादा असल्याने नवी इमारत उभारण्यात येत आहे. नवीन इमारत 2022 मध्ये स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनी ‘न्यू इंडिया’ च्या गरजा आणि आकांक्षांशी जुळणारी आहे.

दरम्यान, या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे नेते, केंद्रीय मंत्री आणि अनेक देशांचे राजदूत उपस्थित होते. या भवनाची निर्मिती टाटा समूहामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे देखील उपस्थित होते. सद्या मात्र या संसद भवनाच्या कमला लगेच सुरुवात होऊ शकणार नाही. या संबंधातील एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

भूमिपूजनाच्या विधींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांसह भारतातील जनतेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, ‘आपल्या देशाचं आणि संविधानाचं निर्माण या संसद भवनात झालंय. या संसद भवनानं देशाचे अनेक चढ-उतार, आशा-आकांक्षा पाहिल्यात. देशाच्या प्रवासाचं हेदेखील एक प्रतिक राहिलंय. हे सर्व आपला वारसा आहे, परंतु संसदेच्या सामर्थ्यवान इतिहासाबरोबरच वास्तवही स्वीकारलं जाणं आवश्यक आहे. हे संसद भवन आता विश्राम मागतंय. नव्या निर्माणाच्या माध्यामातून संसद भवन अपग्रेड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नवी ध्वनी, आयटी सुरक्षा व्यवस्था वापरण्यात येणार आहे.’

यासोबतच, ‘नवीन संसद भवनात अनेक नवीन कामं केली जात आहेत ज्यामुळे खासदारांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. कार्यसंस्कृतीत आधुनिक पद्धत समाविष्ट होईल. जेव्हा नागरिक खासदारांना भेटायला येतात तेव्हा त्यांना सद्य संसद भवनात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. संसद भवनात जागेचा अभाव आहे. परंतु भविष्यात प्रत्येक खासदारासाठी अशी व्यवस्था असेल की ते आपल्या संसदीय मतदार संघातील लोकांना भेटू शकतील,’ अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

तर, ‘नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचा साक्षीदार असेल. जुन्या इमारतीमुळे देशातील आवश्यकता पूर्ण झाल्या परंतु नवीन संसद भवन २१ व्या शतकाच्या आकांक्षा पूर्ण करेल. आम्ही भारतीय लोक एकत्रितपणे आपल्या संसदेची ही नवीन इमारत बनवू… जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी साजरी केरल तेव्हा संसदेची नवीन इमारत होईल त्या महोत्सवाची प्रेरणा ठरेल, याहून पवित्र काय असू शकेल,’ अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!