Share

विराटच्या ‘पॅटरनिटी’ लीव्हला स्टिव्ह स्मिथचा पाठींबा

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाने एकदिवसीय मालिका गमावली. मात्र यानंतर 2-1 च्या फरकाने टी 20 मालिका जिंकली. टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज झालाय.

१७ डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून भारतीय संघ पहिल्यांदाच परदेशात गुलाबी चेंडूवर सामना खेळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने हा सामना संपल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे.  पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली ‘पॅटरनिटी’ लीव्हवर जाणार आहे. या निर्णयावरुन विराटवर टीकाही झाली.

परंतू ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने विराटच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे.“पहिल्या कसोटीनंतर विराटचं भारतात परतण यात टीम इंडियाचं नुकसान आहे. विराट हा उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्यालाही ऑस्ट्रेलियात खेळायला आवडतं.

पण तो देखील एक माणूस आहे आणि क्रिकेटव्यतिरीक्तही विराटला एक आयुष्य आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी तो परिवारासोबत राहतो आहे ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. यासाठी त्याला दाद द्यायलाच हवी.” पहिल्या कसोटी सामन्याआधी स्मिथ पत्रकारांशी बोलत होता. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व हे उप-कर्णधार अजिंक्य रहाणेकडे येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!