Share

पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचा एल्गार; मुंबईत आक्रमक निदर्शने

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- पेट्रोल आणि डिझेलवाढी विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. मुंबईत आज शिवसेनेच्यावतीने पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. प्रमुख नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शिवसेनेकडून ही आंदोलने करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर टाकलेला हा दरोडा आहे. मदत करण्याऐवजी सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. काही पैसे कमी करायचे आणि रुपया वाढवायचा असा खेळ केंद्र सरकारचा सुरू आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात देखील कच्च्या तेलाचे भाव वाढलेले असतानाही त्याचा अतिरिक्त ताण हा राज्य सरकारवरती आला नव्हता. परंतु, आता केंद्र सरकारची तिजोरी भरण्यासाठी ही दरवाढ केली जात आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचा धिक्कार करतोय, अशी प्रतिक्रिया शिवसेना कार्यकर्त्यांनी दिली आहे.

यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधातील विविध प्रकारचे फलक झळकावले. ‘बेचारी जनता करे पुकार, लूट रही है मोदी सरकार’, अशा शब्दांत टीका करण्यात आली. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलची भरमसाट दरवाढ करून सर्व सामन्याचे कंबरडे मोडत आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करीत असून सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, असे शिवसैनिक आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!