🕒 1 min read
कोल्हापूर:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे.
विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसची गोळाबेरीज करण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांना स्वगृही आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपने आवाडे यांच्या हाती ‘कमळ’ देऊन पक्षाचे मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली आरंभल्या आहेत. यामध्ये दोन्ही पक्षांतील बडे नेते सक्रिय झाले आहेत.
पदवीधर प्रचारावेळी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी अरुण लाड यांच्या प्रचाराच्या साहित्यामध्ये प्रकाश आवाडे यांचे छायाचित्र असल्याचा उल्लेख करीत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील यांना आवाडे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश द्यावा, असे भर सभेत विधान केले होते. पदवीधरची निवडणूक संपल्यानंतर लगेचच काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी एच.के.पाटील यांच्यासह सतेज पाटील, विश्वजीत कदम या मंत्र्यांसह बडय़ा नेत्यांनी सोमवारी एका स्नेह भोजनाच्या निमित्ताने माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केली. एच.के.पाटील व आवाडे यांची गेली अनेक वर्षे जवळीक आहे.
पाटील यांच्या माध्यमातून आवाडे यांच्या औद्योगिक प्रकल्पाला अर्थसाहाय्य उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे. पाटील यांनी राजकीय कारणासाठी ही भेट नसल्याचे पत्रकारांना सांगितले आहे. मात्र राजकीय वर्तुळात आवाडे स्वगृही परत येतील, असे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशातील असंतोष विझविण्याऐवजी तो भडकलेला ठेवण्यात सरकारला रस आहे : शिवसेना
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- मराठा आरक्षण : सरकार मराठा समाजाची थट्टा करत आहे : समरजितसिंह घाटगे
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- खा. शरद पवारांच्या नावाने महाविकास आघाडी सरकार लागू करणार योजना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
