Share

फेसबुक युझेर्स साठी महत्वाची बातमी: ‘या’ कारणामुळे फेसबुकला विकावं लागणार व्हाट्सअप आणि इन्स्टाग्राम देखील…

Published On: 

🕒 1 min read

वॉशिंग्टन: समाज माध्यमे ज्याप्रमाणे लोकांना जवळ आणतात त्याचप्रमाणे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच काम देखील सामाज्माध्यामेच मोठ्या प्रमाणात करत असतात. त्याच बरोबर समाज माध्यम कंपन्या देखील वादाच्या भोवर्यात सापडतात. असाच प्रकार समोर आला तो फासबूकच्या फेसबुकविरोधात हा खटला दाखल झाल्याचं वृत्त समोर आल आहे. तर या प्रकरणामध्ये फेसबुकला व्हाट्सअप आणि इन्स्टाग्राम देखील विकाव लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुधवारी फेसबुकविरोधात हा खटला दाखल झाल्याचं वृत्त समोर येताच फेसबुकचे शेअर्सही गडगडले. एखाद्या मोठ्या टेक कंपनीविरोधात अमेरिकेमध्ये यावर्षात दाखल झालेला हा दुसरा मोठा खटला ठरला आहे. यापूर्वी अमेरिकेच्या निवडणुकांआधी गुगलविरोधातही खटला दाखल करण्यात आला होता. ऑनलाइन सर्च आणि जाहिरातींच्या मार्केटवर ताबा मिळवण्याचा आरोप गुगलवर करण्यात आला होता.

फेसबुकविरोधात दाखल केलेल्या खटल्याबाबत फेडरल ट्रेड कमिशन आणि न्यू-यॉर्क अ;ॅटॉर्नी जनरल लेटिटिया जेम्स यांनी माहिती दिली. जवळपास एका दशकापासून, फेसबुक आपल्या ताकदीचा वापर करुन छोट्या प्रतिस्पर्ध्यांना चिरडून टाकण्यासाठी करत आहे, असं जेम्स म्हणाले. आपल्या वर्चस्वासाठी धोका ठरण्याआधीच फेसबुक छोट्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचं अधिग्रहण करते असाही आरोप त्यांनी केला.

दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमेरिकेतील जवळपास सर्व राज्ये फेसबुकविरोधात एकवटल्याचं चित्र आहे. अमेरिकेतील 46 राज्यांनी आणि ‘युएस फेडरल ट्रेड कमिशन’ने फेसबुकविरोधात खटला दाखल केला आहे. फेसबुकवर एकाधिकार स्थापित करण्याचा आणि छोट्या प्रतिस्पर्ध्यांना ‘चिरडण्यासाठी’ बाजारातील ताकदीचा गैरवापर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ;ॅप या दोन्ही प्लॅटफॉर्म्सचा बिजनेस पॅरेंट कंपनीपासून वेगळा ठेवण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे.

फेसबुकने आपला एकाधिकार टिकवण्यासाठी एक रणनीति तयार केली आहे. 2012 मध्ये फोटो शेअरिंग अ;ॅप इंस्टाग्रामचं अधिग्रहण, 2014 मध्ये मोबाइल मेसेजिंग अ;ॅप व्हॉट्सअ;ॅपचं अधिग्रहण हा त्यांच्या रणनितीचाच भाग आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना तोटा झाला आणि सोशल नेटवर्किंगसाठी नेटकऱ्यांसमोर मर्यादित पर्याय राहिलेत असा आरोप फेसबुकवर करण्यात आला आहे.

दुसरीकडे, फेसबुकच्या जनरल काउंन्सल जेनिफर न्यूस्टेड यांनी खटल्याचा विरोध करताना हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. तसेच, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ;ॅपबाबतचे आरोपही त्यांनी फेटाळले. अधिग्रहण केल्यापासून इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ;ॅपला तोटा होण्याऐवजी जास्त फायदा झाला, शिवाय दोन्ही प्लॅटफॉर्म्सच्या युजर्सनाही फायदा झाल्याचं, जेनिफर न्यूस्टेड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या खटल्याचा निकाल जर फेसबुकविरोधात गेला तर फेसबुकला इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ;ॅप हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स विकावे लागण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!