Share

शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या रावसाहेब दानवेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : राष्ट्रवादी

Published On: 

मुंबई : एकीकडे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत.

दानवे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच टीकेचे धनी बनले आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत रावसाहेब दानवेंनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून त्यांच्याकडे याबाबबतचे पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांना द्यावेत आणि आपल्या वक्तव्यावर ठाम राहावे, असा खोचक सल्ला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला आम आदमी पक्षाने देखील दानवे यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान,आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाला चीन व पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे वक्तव्य करुन देशातील  शेतकऱ्यांचा  अपमान केलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावसाहेब दानवेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी,अशी राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!