Share

भाजपच्या पराभवावर अमृता फडणवीस म्हणतात…’ही वाईट सुरुवात मात्र…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. दरम्यान, भाजपने काल धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून विजयी सुरुवात तर केली मात्र यात पुढे महाविकास आघाडी भाजपचा विजयी रथ रोखण्यात यशस्वी झाली.

भाजपच्या या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर सणसणीत टीका केली आहे. तर, भाजप नेत्यांनी पराभव मान्य करतानाच शिवसेनेला मुख्यमंत्री स्वतःचा असताना खातं उघडता आलेलं नाही त्यामुळे त्यांनी देखील आत्मचिंतन करावं असा सल्ला दिला आहे. आता, भाजपच्या पराभवावर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अमृता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे.

हा पराभव ही चांगल्या शेवटची नांदी असल्याचं म्हणत त्यांनी धीर दिला आहे. ‘ही वाईट सुरुवात नक्कीच चांगल्या शेवटाला कारणीभूत ठरेल’ असा विश्वास देखील अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजपला १२ वर्षे दबदबा असलेल्या पुण्याच्या जागेसह बालेकिल्ला असलेल्या नागपूरची जागा देखील गमवावी लागल्यामुळे हा पराभव जिव्हारी लागला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!