🕒 1 min read
पुणे : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.पुणे शिक्षक आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.आम आदमी पार्टीचे नेते मुकुंद किर्दत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडे झुकलेल्या मतदारांचा त्या पक्षाकडून भ्रमनिरास होत असल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांना गृहीत धरणे भाजपच्या अंगाशी आले आहे. पण त्याच वेळेस पदवीधर मतदारांनी पक्षीय हितसंबंधांना झुकते माप दिल्याचे दिसते आहे.
ते म्हणाले,कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर खरे तर शिक्षित मतदाराने या निवडणुकीद्वारे आशा आकांशा आणि धोरणात्मक दिशाबाबत अपेक्षा व्यक्त करायला हव्या होत्या, परंतु तसे झालेले नाही. पश्चिम महाराष्ट्रात असलेला साखर आणि सहकार क्षेत्राचा प्रभाव या निकालातही स्पष्टपणे दिसतो आहे. उमेदवाराची स्वच्छ प्रतिमा ,काम, अभ्यास असला तरी आम आदमी पार्टीसाठी ही दीर्घकालीन लढाई आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. मात्र, भाजपाचे बालेकिल्ले असलेल्या पुणे आणि नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेले यश खूप महत्वाचे आहे. महाविकास आघाडीने गेले वर्षभर एकत्र येऊन काम केले, ते लोकांनी स्वीकारले आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळत आहे, असे पवार म्हणाले.
दरम्यान, कॉंग्रेसच नेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. ‘नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार, काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांचा विजय म्हणजे दीक्षाभूमीचा ‘संघ’भूमीवर विजय आहे.नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या विजयाचा विशेष आनंद होत असून यासाठी हातभार लावणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार’! असे नितीन राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधर निवडणूकीत अभिजित बिचुकलेंनी घेतली ‘एवढी’ मते
- ‘इथून पुढील निवडणुका बॅलेट वर झाल्यास भाजपाला त्यांची खरी पात्रता कळेल’
- महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केन्द्राचे होतेय राष्ट्रीय पातळीवर कौतुक
- मनसेच्या रणरागिणी ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना ‘इतकी’ मतं!
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसची राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

