🕒 1 min read
पुणे : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.पुणे शिक्षक आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. ह्या निकालांमध्ये भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळाला. यातही भाजपला आनंद वाटण्याचे फारसे कारण नसावे. कारण तो उमेदवार भाजपने काँग्रेसमधून आयात केलेला उमेदवार आहे.
ते म्हणाले, निकलामधून महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील ह्यांची हवा काढण्याचे काम केले आहे. सातत्याने प्रचंड अहंकारात असणारे हे दोन्ही नेते कालच्या निकालावरून चांगलेच तोंडावर पडले आहेत.महाराष्ट्र कांग्रेसमय होतो आहे. आगामी काळात भाजप औषधाला सुद्धा शिल्लक नसेल हेच ह्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. हा विधान परिषद निवडणुकीचा निकाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा निकाल आहे असं त्यांनी म्हटलं आहे..
दरम्यान, “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे धोरण आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तोरण, यामुळेच पदवीधर शिक्षक निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. महाविकास आघाडी स्थापन होऊन एक वर्ष झालं आणि हे दणदणीत यश आलं. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर बहुजन समाजाची ताकद किती प्रमाणात वाढू शकते याच हे उदाहरण आहे, असंही राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. मात्र, भाजपाचे बालेकिल्ले असलेल्या पुणे आणि नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेले यश खूप महत्वाचे आहे. महाविकास आघाडीने गेले वर्षभर एकत्र येऊन काम केले, ते लोकांनी स्वीकारले आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळत आहे, असे पवार म्हणाले.
दरम्यान, कॉंग्रेसच नेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. ‘नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार, काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांचा विजय म्हणजे दीक्षाभूमीचा ‘संघ’भूमीवर विजय आहे.नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या विजयाचा विशेष आनंद होत असून यासाठी हातभार लावणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार’! अस नितीन राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधर निवडणूकीत अभिजित बिचुकलेंनी घेतली ‘एवढी’ मते
- ‘इथून पुढील निवडणुका बॅलेट वर झाल्यास भाजपाला त्यांची खरी पात्रता कळेल’
- महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केन्द्राचे होतेय राष्ट्रीय पातळीवर कौतुक
- मनसेच्या रणरागिणी ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना ‘इतकी’ मतं!
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसची राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

