Share

‘…पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षांनीच रचला मृत्यूचा सापळा’

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. दरम्यान, भाजपने काल धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून विजयी सुरुवात तर केली मात्र यात पुढे महाविकास आघाडी भाजपचा विजयी रथ रोखण्यात यशस्वी झाली.

काल, धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघ जिंकल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी, ‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजच्या सर्वच जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल’ असं भाकीत वर्तवलं होतं. मात्र, धुळे-नंदुरबार वगळता भाजपला कुठेच यश मिळवता आलं नाही.

या निकालानंतर नितेश राणे यांनी पराभव मान्य करतानाच शिवसेनेवर प्रहार केला आहे. या निवडणुकांमध्ये शिवसेनेला खातं देखील उघडता आलेलं नाही. नितेश राणे यांनी, ‘ठीक आहे आम्ही कमी पडलो! पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा.. मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा.. बाकी मैदानात परत भेटूच !!’ असं ट्विट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!