मुंबई : आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’च्या शुटिंग दरम्यान स्टार कास्टला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेता अनिल कपूर, वरुण धवन, अभिनेत्री नीतू सिंह आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
सं सांगण्यात येत आहे की, स्टार कास्टला कोरोनाची लागण झाल्यामुळे चित्रपटाचं चित्रिकरण थांबवण्यात आलं आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करत आहे. एका रिपोर्ट्सनुसार, वरुण धवन, नीतू सिंह आणि अनिल कपूर यांच्यासोबत दिग्दर्शक राज मेहता यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ज्यानंतर निर्मात्यांनी शुटींग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत चारही सेलिब्रिटी पूर्णपणे ठिक होत नाहीत, तोपर्यंत ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाची शुटींग पुन्हा सुरु करण्यात येणार नाही.
‘गुड न्युज’ दिग्दर्शक राज मेहता पुन्हा एकदा असाच एक सिनेमा बनवणार आहेत. ‘गुड न्युज’ नंतर आता राज मेहता ‘जुग जुग जियो’ या सिनेमावरती काम करत आहेत. या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत वरून धवन आणि कियारा आडवाणी असणार आहेत. याचदरम्यान आता ‘जुग जुग जियो’ या सिनेमामध्ये वरून धवन व कियारा सोबत यंग लीड कपल नीतू कपूर आणि अनिल कपूर देखील असणार आहेत.
या चित्रपटामध्ये अनिल कपूर आणि नीतू कपूर एका कपलची भूमिका साकारताना दिसणार आहेत.पहिल्यांदाच नीतू आणि अनिल कपूर सोबत काम करताना दिसणार. बॉलीवूड मध्ये इतके वर्ष काम करूनही नितू कपूर आणि अनिल कपूर यांनी सोबत काम केले नाही. नितू आणि अनिल कपूर पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधर निवडणूकीत अभिजित बिचुकलेंनी घेतली ‘एवढी’ मते
- ‘इथून पुढील निवडणुका बॅलेट वर झाल्यास भाजपाला त्यांची खरी पात्रता कळेल’
- महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केन्द्राचे होतेय राष्ट्रीय पातळीवर कौतुक
- मनसेच्या रणरागिणी ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना ‘इतकी’ मतं!
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसची राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं


