🕒 1 min read
मुंबई : वीज बिल माफी वरून भाजप आणि मनसेने हा मुद्दा सातत्याने लावून धरत महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली आहे. वीजबिलावरून राज्य सरकारला आक्रमक इशारा दिला असून सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. यावेळी नागरिकांनी देखील सामील व्हावं. हा प्रचंड प्रमाणात आक्रोश असून जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा देखील मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.
दरम्यान, वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, असं विधान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी, ‘ भाजपचं समर्थन असल्याचं आम्ही जो पब्लिक राडा करणार आहोत त्यात तुम्ही देखील सामील व्हा, फक्त बोलताय कशाला? जनतेसाठी सामील व्हा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वीज बिल भरू नका – नांदगावकर
‘अनेक लोकांनी वीजबिल भरली आहेत पण आमची विनंती आहे कि वीजबिल भरू नका’ असं म्हणत त्यांनी जनतेला वीज बिल तूर्तास न भरण्याचं आवाहन केलं आहे. एप्रिल-मे-जून मधील वाढीव वीजबिल माफ करावी अशी मागणी आम्ही केली होती पर्यंत राज्य सरकारने टोलवाटोलवी करून जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांचं सत्ता आणण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही – जयंत पाटील
- ‘वीज बिलावर सूट द्यावी, अन्यथा सर्वसामान्य जनता तुम्हाला सुट्टी दिल्याशिवाय राहणार नाही’
- कॉंग्रेसमध्येही सुरु झाली जेष्ठ नेत्यांची हेटाळणी; सिब्बलांना चौधरींनी दिला पक्ष सोडण्याचा सल्ला
- ‘आता पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही’
- ‘…अन्यथा उलट-सुलट घटनेस सरकार जबाबदार असेल’; मनसेचं राज्य सरकारला सोमवारपर्यंतचं अल्टिमेटम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

