🕒 1 min read
मुंबई : वीज बिल मुद्यावरून मनसे आंदोलन छेडणार असून, आज मुंबईमध्ये राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीसाठी राज्यभरातले नेते, सरचिटणीस, जिल्हाअध्यक्ष, विभाग प्रमुख, यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले असून राजगडावर ही बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्यास येऊ नये. कर्मचारी वीज कापण्यास आल्यास मनसैनिक त्यांना सामोरे जातील. त्यानंतर काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी सरकारची असेल,’ असा स्पष्ट इशारा नांदगावकर यांनी दिला.
यावेळी त्यांनी वीजबिलावरून राज्य सरकारला आक्रमक इशारा दिला असून सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. यावेळी नागरिकांनी देखील सामील व्हावं. हा प्रचंड प्रमाणात आक्रोश असून जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा देखील बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.
वाढीव वीजबिल माफ करावं म्हणून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पवारांना निवेदनही दिलं. त्यावेळी पवारांनी या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करतो म्हणून आश्वासनही दिलं. मात्र, त्यानंतरही काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतंय, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “CJI विरोधात ट्विट करणाऱ्या कुणाल कामराविरोधात ट्विटरने कारवाई का केली नाही?”
- ‘वीज बिलावर सूट द्यावी, अन्यथा सर्वसामान्य जनता तुम्हाला सुट्टी दिल्याशिवाय राहणार नाही’
- कॉंग्रेसमध्येही सुरु झाली जेष्ठ नेत्यांची हेटाळणी; सिब्बलांना चौधरींनी दिला पक्ष सोडण्याचा सल्ला
- ‘भाजपच्या अकार्यक्षमतेमुळे महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली’
- ‘काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांना निधी तर नाहीच पण इज्जत सुद्धा दिली जात नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

