पुणे : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे.
राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे, आता सवलतीचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत असं देखील राऊत म्हणाले आहेत.
भाजपची सत्ता राज्यात असताना भाजपच्या अदूरदर्शीपणामुळं आणि अकार्यक्षमतेमुळे 5 वर्षात महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली.मार्च 2014 मध्ये 14,154 कोटींवर असलेली महावितरणची सर्व प्रकारच्या ग्राहकांकडील थकबाकी मार्च 2020 ला 51,146 कोटींवर पोचली. pic.twitter.com/RqtXfQv06v
— Dr. Nitin Raut ???????? (@NitinRaut_INC) November 18, 2020
दरम्यान, आता सरकारच्या या निर्णयामुळे चौफेर टीका होऊ लागली आहे. यानंतर आता सारवासारव करत राऊत यांनी भाजपवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याची कबूली राऊत यांनी ट्विटर संदेशात दिली आहे. मात्र, यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजपा सरकारनं पुरेशी कार्यक्षमता न दाखवल्यानं आणि वीज बिलांची वसुली न केल्यानं महावितरणला यापूर्वीच सर्वात मोठा फटका बसला आहे असंही त्यांनी सांगितलं.
भाजपा सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास पोचल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. कोरोना महामारीच्या काळात वीज बिलं भरली न गेल्यामुळे महावितरणची थकबाकी नऊ हजार कोटींनी वाढून ऑक्टो्बरमध्ये ५९ हजार १०२ कोटींवर पोचल्याचं त्यांनी सांगितलं.
एका बाजूला हि टोलवाटोलवी सुरु असताना वीज बिलात सूट द्या अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना तुमची सुट्टी करायला वेळ लागणार नाही असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारला दिला आहे. देसाई म्हणाल्या, गेली सात ते आठ महिने झाले महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आहे. टाळेबंदीमुळे सर्वजण घरी होते, आत्ता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून आठ महिन्यांचे संपूर्ण बिल सर्वसामान्यांना भरणे शक्य नाही. बिलावर आणि वाढीव वीज बिलावर कोणतीही सवलत सरकार देणार नाही,वीजबिल भरावे लागेल असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले आहे. परंतु आत्ता सर्वसामान्यांना हे शक्य नाही.
जसे सरकार आर्थिक अडचणीत होते तसेच सर्वसामान्य सुद्धा आर्थिक अडचणीत आहेत याचा सरकारने विचार केला पाहिजे होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिलावर सूट द्यावी, अन्यथा सर्वसामान्य जनता तुम्हाला सुट्टी दिल्याशिवाय राहणार नाही असं देखील तृप्ती देसाई म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांचं सत्ता आणण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही – जयंत पाटील
- भगव्याचं पेटंट शिवसेनेला दिलंय का? दरेकरांचा संजय राऊतांना टोला
- कॉंग्रेसमध्येही सुरु झाली जेष्ठ नेत्यांची हेटाळणी; सिब्बलांना चौधरींनी दिला पक्ष सोडण्याचा सल्ला
- ‘भाजपच्या अकार्यक्षमतेमुळे महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली’
- शिक्षणाला वयाची अट नसते ! ५६ व्या वर्षी एकनाथ शिंदेंचं पदवी परीक्षेत घवघवीत यश…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

