मुंबई : वीज बिल मुद्यावरून मनसे आंदोलन छेडणार असून, आज मुंबईमध्ये राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीसाठी राज्यभरातले नेते, सरचिटणीस, जिल्हाअध्यक्ष, विभाग प्रमुख, यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले असून राजगडावर ही बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी वीजबिलावरून राज्य सरकारला आक्रमक इशारा दिला असून सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. यावेळी नागरिकांनी देखील सामील व्हावं. हा प्रचंड प्रमाणात आक्रोश असून जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा देखील बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.
‘राज्य सरकारची डोळे उघडण्याची आवश्यकता असून अन्यथा जर राज्य वीज मंडळाचे कर्मचारी वीज कापण्यास आले तर मनसैनिक स्वतः हजर असतील. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातून काही उलट-सुलट घटना घडल्यास त्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदारी असेल. त्यामुळे मंत्र्यांची बिले माफ होत असतील आणि सामान्य जनतेला त्रास देण्यात येत असेल तर मनसे शांत बसणार नाही’ असं देखील त्यांनी राज्य सरकारला ठणकावलं आहे.
‘अनेक लोकांनी वीजबिल भरली आहेत पण आमची विनंती आहे कि वीजबिल भरू नका’ असं म्हणत त्यांनी जनतेला वीज बिल तूर्तास न भरण्याचं आवाहन केलं आहे. एप्रिल-मे-जून मधील वाढीव वीजबिल माफ करावी अशी मागणी आम्ही केली होती पर्यंत राज्य सरकारने टोलवाटोलवी करून जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांचं सत्ता आणण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही – जयंत पाटील
- ‘वीज बिलावर सूट द्यावी, अन्यथा सर्वसामान्य जनता तुम्हाला सुट्टी दिल्याशिवाय राहणार नाही’
- कॉंग्रेसमध्येही सुरु झाली जेष्ठ नेत्यांची हेटाळणी; सिब्बलांना चौधरींनी दिला पक्ष सोडण्याचा सल्ला
- ‘भाजपच्या अकार्यक्षमतेमुळे महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली’
- शिक्षणाला वयाची अट नसते ! ५६ व्या वर्षी एकनाथ शिंदेंचं पदवी परीक्षेत घवघवीत यश…


