मुंबई : मुंबई भाजपच्या विद्यमान कार्यकारिणीच्या कार्यकाळातच मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त करत भ्रष्टाचाराचे आगार असलेली मुंबई महापालिकेची सत्ता २०२२ मध्ये उलथवून लावायची, असे निर्देश भाजपाचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या माध्यमातून फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने बिहारनंतर आता ‘मिशन मुंबई’ सुरू केले आहे.
२०२२ च्या महापालिका निवडणुकांमध्ये जुने मित्र शिवसेना आणि भाजप आमने-सामने असणार आहेत. सद्या या महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून अजून लांब असलेल्या महापालिका निवडणुकांतून मुंबईची सत्ता कोणाच्या हाती जाणार हा प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने भाजपने आतापासून आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
फडणवीसांच्या गर्जनेनंतर आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. पालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलंय.
मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी, असं फडणवीसांना वाटणं स्वाभाविक आहे. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्ष महापालिकेत एकत्र येणार असून सत्ता आणण्याचं फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- महिला IPS अधिकाऱ्यावर कंगणा भडकली म्हणाली, ‘… हे तर आरक्षणाचे दुष्परिणाम’
- ‘मिशन मुंबई’ मध्ये महाविकास आघाडी विरोधात भाजप-मनसे एकत्र येणार ? दरेकर म्हणतात…
- वाढीव वीज बिलावरून मनसे आक्रमक ; घेणार राजगडावर महत्वाची बैठक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! आता CBI च्या तपासासाठी राज्यांची परवानगी लागणार…
- शेवटी पुंगी वाजवल्या शिवाय शाबासकी कशी मिळणार बरं ?


