🕒 1 min read
बारामती : बारामती म्हणलं की पवार कुटुंबाचं नाव लागेचचं समोर येतं. गेली अनेक दशके राजकारण, सहकार क्षेत्र यात पवार कुटुंबाने बारामतीसह राज्यभरात आपला दबदबा निर्माण केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे अशा दिग्गज नावांमुळे बारामतीमधील विकास चर्चेचा विषय ठरतोच.
भाजपमधील केंद्रीय नेत्यांनी देखील बारामतीचं कटुक केल्याचं दिसून आलं होतं. मात्र, आता बारामतीमधील अनोख्या निदर्शनाची चर्चा सद्या होत आहे. कारण,पहिल्यांदाच नगरपालिकेवर काळे झेंडे फडकल्याचं पाहायला मिळालं. नगरपालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) मिळवण्यासाठी थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून शुक्रवारी आंदोलन करून काळे झेंडे दाखवले. दिवाळीनिमित्त नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बोनस मिळावा, अशी मागणी केली. या मागणीसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्यादिवशीही नगराध्यक्षा किंवा नगरसेवकांपैकी कोणीही भेटायला आलं नसल्यामुळे हे कर्मचारी आक्रमक झाले. काळे झेंडे फडकल्याची बातमी पसरताच उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या प्रकराची दखल घेत तातडीने या कर्मचाऱ्यांना बैठकीला बोलावले आहे. आज संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेत हिम्मत असेल तर मला हात लावून दाखवावा, माझं चॅलेंज’ – किरीट सोमय्या
- राऊतांनी थातुरमातूर न बोलता सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत – राम कदम
- ‘नुसतं भो-भो करू नकोस, सिद्ध कर’ – किशोरी पेडणेकर
- गोंडस तैमूर नंतर करीना कूपर खानला हवं कन्यारत्न
- पक्षाने पुन्हा डावललं, आता पक्ष सोडणार का? मेधा कुलकर्णी म्हणतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
