🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी जमिनीचे व्यवहार झाल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रंही सादर केली आहेत.
उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी आज देखील पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
‘भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा. बाकीच्या शिवसेना नेत्यांनी विषय भरकटवू नये. शिवसेनेत हिम्मत असेल तर मला हात लावून दाखवावा, माझं चॅलेंज आहे. संजय राऊत यांनी उत्तर द्यावीत. पण त्यांना काही माहित नाही. उद्धव ठाकरेंना याप्रकरणात सर्व माहिती असून त्यांनी यावर बोलावं’ असं ते म्हणाले. यासोबतच त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत.
सोमय्यांच्या या आरोपांना शिवसेनेनेदेखील प्रतिआव्हान दिलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, ‘नुसतं भो-भो करू नकोस, सिद्ध कर’ अशी जळजळीत टीका केली आहे. ‘दिवाळीत उत्साहाचं वातावरण आहे पण किरीट सोमय्या भो-भो करून हे वातावरण बिघडवत आहेत. ते नुसतं आरोप करतात म्हणून आम्ही आरोपी होत नाही. त्यांनी सिद्ध करून दाखवावं,’ असं पेडणेकर म्हणाल्या आहेत.
त्यामुळे आता अन्वय नाईक यांचं मृत्यूप्रकरण पुन्हा वादात सापडलं असून आता भूखंड घोटाळा असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर शिवसेना विरुद्ध किरीट सोमय्या यांच्यात सुरु झालेला वाद विकोपाला जात आहे. किरीट सोमय्या यांनी यासर्व घोटाळ्यावरून जनहित याचिका देखील दाखल केली असून पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेत हिम्मत असेल तर मला हात लावून दाखवावा, माझं चॅलेंज’ – किरीट सोमय्या
- राऊतांनी थातुरमातूर न बोलता सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत – राम कदम
- यूएईतून मायदेशी परतताना विमानतळावर पांड्याची तीन तासांहून अधिक काळ चौकशी
- आमिर खानची फजिती : जायचं होतं फडणवीसांच्या दारी, पोहचले अशोक चव्हाणांच्या घरी !
- उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ मंदिरात दीपावली उत्सव; झेंडूच्या फुलांनी सजवले बद्रीनाथ मंदिर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
