Share

पक्षाने पुन्हा डावललं, आता पक्ष सोडणार का? मेधा कुलकर्णी म्हणतात…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.

तर, पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानसभेवेळी डावलण्यात आलेल्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. विधानसभानवेली अचानक तिकीट कापल्याने त्या देखील नाराज होत्या मात्र नंतर पक्ष नेतृत्वाने त्यांची समजूत काढल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रचार कामात त्या सक्रिय झाल्या होत्या.

मात्र, आता पदवीधर निवडणुकांत पुणे विभागातून सांगलीच्या संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिल्याने पक्षाने पुन्हा एकदा मेधा कुलकर्णी यांना डावलले असून त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. याबाबत चर्चांवर मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, विधानसभेवेळी मला विधान परिषदेचा शब्द दिला होता, विद्यमान कोथरूडचे आमदार आणि प्रदेशाध्यक्षांसाठी कोथरूड जागा सोडली असं म्हणण्यापेक्षा पक्षाचे आदेश होता तो मानला, पक्षासोबत माझी निष्ठा आहे, पक्ष माझा विचार करेल याचा विश्वास आहे. कोथरूड माझं माहेर आहे, कोथरूडमधून निवडणूक लढवणं यापेक्षा दुसरा आनंद नाही. माझ्यासाठी ते स्वर्ग आहे, कुठल्याही महिलेला माहेर किती प्रिय असतं हे सांगण्याची गरज आहे. कोथरूडमध्ये मी निश्चित पुढील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, ‘मी पक्षावर नाराज असण्याचं कारण नाही, केंद्रातलं सरकार अतिशय उत्तमपणे काम करतंय, गेल्या ६० वर्षात जे निर्णय होऊ शकले नाहीत ते केंद्र सरकारने केले आहेत. माझं आयुष्य पक्षासाठी ओवाळून टाकेन, काहींच्या बद्दल माझी नाराजी, म्हणणं असू शकतं, पक्षाच्या हितासाठी जे म्हणणं असेल ते पक्षांतर्गत मांडेन, पक्षाबद्दल कोणतीही नाराजी नाही, मी कायमस्वरुपी भाजपात आहे. मी स्वातंत्र्यसैनिकाची मुलगी आहे, मी लहानपणापासून संघाच्या कुटुंबात वाढले, विचारसरणी संघाची आहे. पक्ष सोडून जायचं नाही, भाजपा माझ्या गुणांची दखल घेईल याची खात्री आहे.’ असा विश्वास मेधा कुलकर्णींनी व्यक्त केला आहे.

काही जुनेजाणते कार्यकर्तेही आता डावलले जात असल्याचं दिसून येते, त्यातून वेगळा विचार करण्याचा आग्रह करतात, पण मी त्यांना सांगते, आपण विचारधारेसाठी नेहमी सक्रीय राहिलं पाहिजे. मी पक्षात कार्यकर्ता म्हणून आहे, नेतृत्वाने याबद्दल निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार करणे अपेक्षित असतं, असा खुलासा करत त्यांनी पक्षांतराच्या चर्चाना उत्तर देत पूर्णविराम लावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!