Share

राऊतांनी थातुरमातूर न बोलता सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत – राम कदम

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी जमिनीचे व्यवहार झाल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रंही सादर केली आहेत.

उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईमध्ये काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले. यानंतर शिवसेना नेते देखील आक्रमक झाले आहेत.

शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र” असा आक्रमक इशारा देखील संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिला.

संजय राऊत यांच्या इशाऱ्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी संजय राऊत यांना सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचं आव्हान दिलं आहे. संजय राऊत का त्रागा करून घेत आहेत माहीत नाही. सोमय्या यांनी कागदपत्रांच्या आधारे आरोप केला आहे. त्यावर राऊतांनी बोललं पाहिजे. सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. थातूरमातूर उत्तरं देऊ नये, असं सांगतानाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप झाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर कुणी हा प्रश्नही उपस्थित केला नसता. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जमिनीचे 21 व्यवहार केलेत की नाही ते राऊतांनी सांगावं, अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!