मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी जमिनीचे व्यवहार झाल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रंही सादर केली आहेत.
उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईमध्ये काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले.
यानंतर, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. “अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र” असा आक्रमक इशारा देखील संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिला.
संजय राऊत यांच्या टीकेला किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेतून खुलं आव्हान दिलं आहे. ‘ भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा. बाकीच्या शिवसेना नेत्यांनी विषय भरकटवू नये. शिवसेनेत हिम्मत असेल तर मला हात लावून दाखवावा, माझं चॅलेंज आहे. संजय राऊत यांनी उत्तर द्यावीत. पण त्यांना काही माहित नाही. उद्धव ठाकरेंना याप्रकरणात सर्व माहिती असून त्यांनी यावर बोलावं’ असं म्हणत त्यांनी शिवसेनेसह उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.
त्यामुळे आता अन्वय नाईक यांचं मृत्यूप्रकरण पुन्हा वादात सापडलं असून आता भूखंड घोटाळा असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर शिवसेना विरुद्ध किरीट सोमय्या यांच्यात सुरु झालेला वाद विकोपाला जात आहे. किरीट सोमय्या यांनी यासर्व घोटाळ्यावरून जनहित याचिका देखील दाखल केली असून पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊत सोमय्यांवर भडकले
- राऊतांनी थातुरमातूर न बोलता सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत – राम कदम
- पार्सल कोल्हापूरवरून आलं काय किंवा सांगलीवरून आलं काय, ते व्हाया पुणेच दिल्लीला जातं– गिरीश बापट
- आमिर खानची फजिती : जायचं होतं फडणवीसांच्या दारी, पोहचले अशोक चव्हाणांच्या घरी !
- शेतकरी विरोधी धोरणे रद्द करावीत; बलिप्रतिपदा दिनी हजारो शेतकरी पंतप्रधानांना पत्र पाठविणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
