Share

‘शरद पवार यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल’

Published On: 

औरंगाबाद : भाजपला धक्का देत शिवसेनेने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना केली. यानंतर, या विसंगत विचारधारा असलेल्या पक्षाचे सरकार फार काळ टिकणार नाही अशी टीका भाजप नेत्यांनी केली.

आता, या सरकारला वर्षपूर्ती होत आली असून अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आहे. काँग्रेस नेत्यांची नाराजी, शिवसेनेतील स्थानिक नेत्यांची बंडखोरी, राष्ट्रवादीच्या मुत्सद्देगिरीचा आरोप देखील या काळात करण्यात आला. त्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याचं वारंवार समोर आलं पण राज्य पातळीवरील नेत्यांनी सरकारला स्थिर ठेवले.

तर, हे सरकार स्वतःच्याच कर्माने पडणार अशी टीका भाजप नेत्यांनी वेळोवेळी केल्याचं दिसून आलं. आता, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देत हे सरकार पाच वर्षे टिकणार असं प्रत्युत्तर दिलं आहे. कोणी काहीही बोललं तरी काय होणार नाही. शरद पवार यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार, असं विधान त्यांनी केलं आहे.

दरम्यान, आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही. तर, पुन्हा निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कालच प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!