Share

मेकअप खराब न करता कोरोनापासून वाचण्यासाठी सनी लिओनिची अनोखी शक्कल !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोरोना संसर्ग टाळायचा असेल तर सध्या तरी जगभर मास्क वापरणे हा एकच उपाय उपलब्ध आहे. त्यामुळे विना मास्क गर्दीच्या ठिकाणी जाणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरते. तर सुरुवातीला काही महिने लॉकडाऊन मध्ये नागरिक घराबाहेर पडत नव्हते. तसेच अपवाद सोडता सर्वत्र नियमांचे पालन देखील केले जात होत. मात्र आता सर्वत्र लॉकडाउन जसे शिथील होत गेले तसतसे लोकांमधील कोरोनाचे गांभीर्य कमी झाल्याचे दिसून येत आहे.

तर आता चित्रपटांचं शूटिंग सुरू झाल्यामुळे सेलिब्रिटींना देखील संसर्गाचा धोका वाढला आहे या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने शूट दरम्यान सुरक्षित राहण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. कोरोनाच्या साथीच्या काळात तिने आपला मेकअप बेमालुमपणे वाचवला आहे. सनीने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती पारदर्शक मास्क घातलेली दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CHZoZ0hj0pn/?igshid=tmwcghlurrat

या फोटोमध्ये सनीने आपल्या ट्रान्स्परन्ट मास्कने तोंड आणि नाक पूर्णपणे झाकले आहे. या मास्कची खासियत ही आहे की, तिची लिपस्टिकही खराब होत नाही. सनीने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, मेकअप खराब न करता शॉट्स दरम्यान सेफ. कोरोनाच्या साथीच्या काळात सनी लिओनीने आपला मेकअप वाचवला आहे. सनीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती पारदर्शक मास्क घातलेली दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!