अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : आठ पोलिस अधिक्षक व आठ सहाय्यक पोलिस अधिक्षक अशा १६ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केल्या आहेत. जिल्ह्यातील १६ पोलिस अधिकार्यांच्या केलेल्या बदल्या सर्व जिल्हा अंतर्गत आहेत. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविणचंद लोखंडे यांची विनंती बदली करण्यात आली असून कोपरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांची बदली लोखंडे यांच्या जागी करण्यात आली आहे.
साई मंदिर सुरक्षा विभागातील निरीक्षक हनुंमत गाडे यांची राहुरी पोलिस ठाण्यात, जामखेड पोलिस ठाण्यातील प्रभाकर पाटील यांची नियंत्रण कक्षात, नियंत्रण कक्षातील सुहास चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखेत, संगमनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांची नियंत्रण कक्षात, राहुरी पोलिस ठाण्याचे मुकुंद देशमुख, यांची संगमनेर शहर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
तसेच सोमनाथ दिवटे यांची कर्जत पोलिस ठाण्यात, महेश जानकर यांची जामखेड पोलिस ठाण्यात, अश्विनी पाटील यांची पोलिस अधिक्षक कार्यालयातील वाचक कक्षात तर श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील राजेंद्र सानप यांची स्थानिक गुन्हे शाखेत, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांची लोणी पोलिस ठाण्यातून शहर वाहतूक विभागात, समाधान पाटील यांनी श्रीरापूर पोलिस ठाण्यातून लोणी पोलिस ठाण्यात, राहुरी पोलिस ठाण्यातील सचिन बागुल यांची शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात तर रामचंद्र करपे यांची सोनई पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी बदली झालेल्या जिल्ह्यातील १६ अधिकार्यांच्या बदल्यानियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयाने अशीच तत्परता मराठा आरक्षणप्रश्नी दाखवावी – सचिन सावंत
- जेलमधून बाहेर पडताच अर्नबची दुसऱ्या जामिनासाठी पळापळ !
- ‘देशात पहिल्यांदा मंदी आली, मोदींनी देशाची शक्ती कमकुवत केली’
- मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत प्रयत्न करणार – जयंत पाटील
- ‘मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ, पण…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

