मुंबई : मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत निश्चित प्रयत्न करु, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. मल्टिप्लेक्स सिनेमासंदर्भातील विविध अडीअडचणी सोडविण्याबाबत यूएफओ, सिनेपोलीस व इतर कंपन्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालय येथे मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले.
मल्टिप्लेक्स सुरु करताना येत असलेल्या अडचणी, खाद्यपदार्थ थिएटरमध्ये घेऊन जाण्याची परवानगी तसेच कर परती व इतर अनुषंगिक बाबींबाबत मदत करावी अशा या शिष्टमंडळाच्या मागण्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत चर्चा करुन लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जयंत पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
अभिनेते सुदीप पांडे, सिनेपोलीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवांग संपथ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रविन्द्र मानगावे, यूएफओचे सचिव प्रकाश चाफळकर, पदाधिकारी,अरविंद चाफळकर, शिरीष देशपांडे, विष्णू पटेल आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ, पण…’
- पवार साहेबांचा सल्ला घेऊन बिहारमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबवा, शिवसेना नेत्याचा नितीश कुमारांना सल्ला
- पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे हा इतिहास झाला, यावेळी आमचा उमेदवार जिंकेल- बाळासाहेब थोरात
- आयबीएकडून ८.५ लाख सरकारी बँक कर्मचार्यांना १५ टक्के वार्षिक वेतनवाढ जाहीर
- बनावट डिझेल प्रकरण; मुख्य सुत्रधार देशमुखला अखेर अटक, आणखी आरोपी वाढण्याची शक्यता!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

