Share

सर्वोच्च न्यायालयाने अशीच तत्परता मराठा आरक्षणप्रश्नी दाखवावी – सचिन सावंत

Published On: 

मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णब गोस्वामीसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. अर्णबच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव असता ‘तात्काळ सुनावणी’साठी सूचीबद्ध करून अर्णबच्या जामीनावर काल लगेचच सुनावणी करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरणी तडकाफडकी सुनावणी केल्याने अनेक तज्ज्ञांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. ज्येष्ठ अधिवक्ता आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी सुप्रीम कोर्टाच्या सरचिटणीसांना पत्र लिहून उपस्थित या सुनावणीवर आक्षेप देखील घेतला होता.

काल, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारत उच्च न्यायालयाच्या निकालावर देखील नाराजी व्यक्त केली व अर्णबला अंतरिम जामीन मंजूर केला. यानंतर भाजपच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

अर्णब प्रकरण देशभरात गाजत असतानाच महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झाला असून राज्य सरकारने हा प्रश्न गांभीर्याने मांडून सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती उठवून आरक्षणास मान्यता द्यावी अशी मागणी केली जात आहे.

हाच मुद्दा धरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अर्णब गोस्वामींच्या सुटकेवर महाराष्ट्र देशाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वोच्च न्यायालयाने जी भूमिका घेतली ती इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घेतल्याने आश्चर्यकारक आहे. न्यायालय आपल्या निकालातून नवे पायंडे पाडत आहे, याची सवय जनतेने करून घ्यायला हवी,” अशी उपरोधिक टीका केली आहे. तसेच, “मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या प्रश्नी देखील अशीच सुनावणी व्हावी अशी विनंती आहे.” असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!