🕒 1 min read
मुंबई: लॉकडाउननंतर जगभरातील अर्थव्यवस्थांवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे आलेली आलेली मंदीची लाट यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण होत होती. मात्र अनलॉक प्रक्रियेदरम्यान जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षीय निवडणुकापार पडल्या. इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकन निवडणुकांचे निकाल लागण्यासाठी तब्बल सात दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करत डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. याचा परिणाम भारत-अमेरिका संबंधांवर देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराने जोरदार स्वागत केले आहे. शनिवारी रात्री अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. रंगतदार ठरलेल्या या निवडणुकीत जो बायडेन यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला.
मुंबई शेअर बाजराने सुद्धा जो बायडेन यांच्या विजयाला सलामी दिली आहे. आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजराच्या निर्देशांकाने थेट ६७३ अंकांनी उसळी घेतली. ४२,५०० पेक्षा जास्त अंकांसह निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकाजवळ पोहोचला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा १८० पेक्षा जास्त अंकांसह १२,४५० च्या पुढे गेला. बँकिंग, वित्तीय सेवा आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ दिसून आली. इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली.
महत्वाच्या बातम्या
- उच्च न्यायालयाने जामीन नाकारला, अर्णबचा कारागृहातील मुक्काम वाढला
- राज्यपालांनी अर्णबची चिंता करू नये, त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे – भुजबळ
- ‘उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे’
- बिहार निवडणूक : मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेसह सर्व तयारी पूर्ण
- ‘प्रभू श्रीरामांनी रावणाचा जसा पराभव केला, तसाच करोनाचाही पराभव होणार’ – बोरिस जॉन्सन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
