🕒 1 min read
शारजाह : आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी आता चार संघांचं स्थान निश्चित झालं असून ते जोर लावताना दिसत आहेत. आयपीएल प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणायसाठी मुंबई इंडियन्स वगळता इतर संघांना यंदा चांगलाच संघर्ष करावा लागला.
काल आयपीएलचा अंतिम साखळी सामना होता. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैद्राबादचा कालचा सामना कोलकत्यासाठी निराशाजनक ठरला असून हैद्राबादच्या विजयामुळे कोलकत्याला आपले चौथे स्थान गमवावे लागले व त्यामुळे IPL२०२० च्या जेतेपदासाठीच्या कोलकता संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
यासोबतच कालचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाचा होता. अनफिट असलेला रोहित शर्मा गेले काही सामने संघाच्या बाहेर होता. तर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये देखील रोहित श्रमाचा समावेश करण्यात आलेला नाही. कालच्या सामन्यात मात्र रोहित शर्माला संघात स्थान मिळाल्याने तो पुन्हा एकदा फिट झाल्याचं समोर आलं आहे.
दुखापतीमुळे रोहित शर्माचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विचार केला गेला नाही असे म्हटले जात होते. पण त्याच बरोबर तो फिट झाला तर संघात नक्कीच घेतले जाईल असेही सांगण्यात येते होते. रोहित जर परत येणार असेल तर केएल राहुलला उपकर्णधार करण्याची घाई कसली होती असा देखील प्रश्न विचारला जात होता.
सनरायजर्स विरुद्धच्या लढतीनंतर रोहितने स्वत:च्या दुखापतीबद्दल सांगितले. तो म्हणाला, हॅमस्ट्रिंग दुखापतीमधून मी आता पूर्णपणे बरा झालो आहे. दुखापतीमुळे दोन आठवड्याच्या ब्रेकनंतर मैदानावर परतल्याने मी आनंदी आहे. मैदानावर खेळण्याचा आनंद वेगळा असतो. काही सामने खेळायचे आहेत आणि त्यानंतर बघू कसे काय होते. हॅमस्ट्रिंग आता पूर्णपणे बरे झाले आहे, असा खुलासा खुद्द रोहित शर्माने केल्यामुळे क्रिकेट रसिकांमध्ये सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांना मात्र आता पूर्णविराम लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तर आजचा तमाशा कधीच घडला नसता; नितेश राणेंचा शिवसेनेवर जोरदार प्रहार
- उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
- खडसे आणि माझे जवळचे संबंध असल्यामुळेच लोक माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाची अफवा पसरवितात- कर्डीले
- पापाचे घडे भरले की, सत्तेची मस्ती जनताच उतरवेल, दरेकरांचा ठाकरे सरकारवर घणाघात
- मला अर्नबला भेटू दिले नाही, ही सरकार आणि पोलिसांची दडपशाही – किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
