Share

याला राजकारण ऐसे नाव ! तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांची उमेदवारी रद्द होणार ?

Published On: 

पटना : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी जेडीयूने केली आहे. तेजस्वी आणि तेजप्रताप यांनी जाणीवपूर्वक माहिती लपवल्याचे पुरावे जेडीयुने निवडणूक आयोगाकडे सादर करत दोघांचीही उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.तेजस्वी हे राघोपूर मतदारसंघातून तर तेजप्रताप हे हसनपूर मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीला उभे आहेत.

तेजस्वी हे महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. तेजस्वी यांना या निवडणुकीत मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या सभांना होणारी गर्दी पाहून अनेक नेते या निवडणुकीत तेजस्वी लाट आल्याचा दावा करीत आहेत.

या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि त्यांचे बंधू तेजप्रताप यादव हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरुन वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापले आहे.

तेजस्वी आणि तेजप्रताप यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही मालमत्तांचा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला नाही, असा आरोप जेडीयूने केला आहे. यामुळे त्या दोघांची उमेदवारी रद्द करुन त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी जेडीयूने केली आहे. याविषयी बोलताना जेडीयूचे नेते व माहिती व जनसंपर्क मंत्री नीरज कुमार म्हणाले की, निवडणूक आयुक्तांना आम्ही निवेदन दिले आहे. त्यांनी या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे.पण तरीही येत्या काळात काय  होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा आज झाला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!