Share

जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या; बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

पटना- बिहारमधील पहिल्या टप्प्यातील मतदान नुकतेच झाले आहे. दरम्यान राज्यात सत्ता टिकवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात स्पर्धा सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आरक्षणाबाबत एक महत्वाचे वक्तव्य केल्याने ते आज चर्चेत आहेत.

देशातल्या आरक्षणव्यवस्थेबद्दल एक महत्वाचे आणि गंभीर विधान नितीशकुमार यांनी प्रचारसभेत केले आहे. आरक्षण हे त्या त्या वर्गाच्या लोकसंख्येनुसारच मिळायला हवे असे नितीशकुमार बिहारमधल्या एका प्रचारसभेत म्हणाले आहेत.

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदार पार पडल्यानंतर नितीश कुमार यांची आज वाल्मिकीनगर येथे प्रचारसभा झाली. त्यात त्यांनी आरक्षणाचा मुद्दा काढला. जनगणना करणे हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते पण लोकसंख्येनुसारच आरक्षण मिळायला हवे अशी आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले.

वाल्मिकी नगरमध्ये थारू जातीचे सर्वाधिक व्होट आहेत. अनुसूचित जनजातीमध्ये समाविष्ट करण्याची या जातीची खूप जुनी मागणी आहे. नितीशकुमार यांनी त्यांच्या या मागणीचं समर्थन केलं आहे. जातीनिहाय जनगणना करणं हे आपल्या हातात नाही. मात्र, जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावं ही आपली मागणी असून त्यात कोणतंही दुमत नाही, असं नितीशकुमार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!