Share

हे लोकनियुक्त सरकार नसून षडयंत्रातून तयार झालेले सरकार, ह्या सरकारचा पायगुणच संकटाचा- सुजय विखे

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- यावर्षीच्या मान्सूनने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतातील उभी पिकेही वाया गेली आहेत. महाराष्ट्रात सत्तेवर असणारे सरकार हे लोकनियुक्त सरकार नसून षडयंत्रातून तयार झालेले सरकार आहे. त्यामुळे हे सरकार आल्यापासून अनेक संकटे राज्यात येत आहे. या षडयंत्री सरकारचा पायगूण संकटी आहे आणि त्याचा त्रास जनतेला भोगावा लागत आहे, अशी टिका खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून वाळकी (ता.नगर) येथे शेतकऱ्यांना खेळते भांडवलाचे चेक वाटप खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. खा.विखे पुढे म्हणाले की, राज्य सरकार फक्त केंद्राकडून जीएसटीचे पैसे मागत आहेत. आम्ही जीएसटीचे पैसे आणून देण्यासाठी मदत करतो. ते पैसे राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना देणार का?तेवढे जाहीर करा.

तसेच आजचे मुख्यमंत्री पूर्वी सत्तेत नव्हते त्यावेळी एकरी ५० हजार भरपाई द्या, अशी मागणी करत होते पण आता सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळे झाले. तसेच विधानसभा निवडणूकीनंतर समज गैरसमज झाले पण आता ते सगळे संपले आहेत. कर्डीले यांनी मला मुलगा समजून सगळ काही समजून घेतले आहे. यापुढे आम्ही एकत्र राहणार असून पुढे काय काय होते त्याचे परिणाम दिसून येतील, असे खा.विखे म्हणाले.

यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डीले, बँकेचे संचालक दत्ता पानसरे, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, सरपंच स्वाती बोठे, भाऊसाहेब बोठे, शरद बोठे, श्रीकांत जगदाळे, दिलीप भालसिंग, रमेश धोंडे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!