Share

#पुलवामा हल्ल्याची दिली कबूली,पाकड्यांचा दहशतवादी चेहरा उघड

Published On: 

🕒 1 min read

इस्लामाबाद : भारतात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तान सरकारचा हात असल्याचा भारत सरकारचा दावा खुद्द पाकिस्तान सरकारमधील एका मंत्र्यानेच त्यांच्या संसदेतच सिद्ध केला. यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला आहे.

14 फेब्रुवारी 2019 ला सीआरपीएफच्या 78 बसेसच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. 78 बसेसमधून सुमारे 2500 जवान प्रवास करत होते. सीआपीएफच्या 78 पैकी एका बसला स्फोटकांनी भरलेले चार चाकी वाहन धडकले होते. यामध्ये 40 जवानांना या हल्ल्यात जीव गमवावा लागला. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या संघटेनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पाकिस्तान सुरुवातीपासून पुलवामा हल्ल्याची जबाबदारी नाकारत होता.

पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पुलवामा येथे पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिल्याचे पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत जाहीररीत्या म्हटले. पाकिस्तानी संसदेत फवाद चौधरी म्हणाले, ‘अय्यास सादिक साहेब काल येथे बोलले. तुम्हाला आदर देण्यात आला, तुम्ही संसदेच्या सभागृहात बोलत आहात आणि मग तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने खोटे बोलता की, एक खोटा माणूसदेखील तसे बोलेल. अध्यक्षांचे पाय थरथर कापत आहेत भारत हल्ला करेल म्हणून, हे असे बोलणार्यांना सांगू इच्छतो की आम्ही भारतात घुसून आणि मारले. पुलवामामध्ये आपले जे यश आहे ते इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली यश आहे. याचे साथीदार आपण सगळे आहोत आणि माझ्यासह तुम्हीही आहात.

दरम्यान, फवाद चौधरी यांच्या अगोदर पाकिस्तानचा राजकीय पक्ष पीएमएल-एनच्या खासदाराने खुलासा केला की, भारतीय हवाई दलाचे पायलट अभिनंदन यांची सुटका झाली नसती तर भारत, पाकिस्तानवर हल्ला करण्याचा तयारी होता. त्यांनी याची देखील कबुली दिली की, त्यावेळी पाकिस्तानी लष्कराची स्थिती खराब होती आणि जर पाकिस्तानने अभिनंदनला सोडले नसते, तर भारताने हल्ला केला असता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!