🕒 1 min read
पुणे: आंबेडकरी चळवळीतील मोठे गीतकार आणि संगीतकार तसेच विदर्भातील साहित्य क्षेत्रात मोठं नाव असणारे अनिरुद्ध वनकर यांचं नाव विधानपरिषदेसाठी निश्चित झालं असल्याची चर्चा आहे.महाराष्ट्र विधानपरिषदेत १२ सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत.
कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात.
विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. काँग्रेसकडून गीतकार आणि संगीतकार अनिरुद्ध वनकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.तसेच मुजफ्फर हुसैन, रजनी पाटील आणि सचिन सावंत ही नावं निश्चित झाली असल्याचं बोललं जातंय.
महत्वाच्या बातम्या
- अनिल गोटे यांनी पाडले भाजपला खिंडार,धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…
- जान सानू प्रकरण: चौफेर टीकेनंतर अखेर ‘कलर्स’ने मागितली महाराष्ट्राची माफी
- स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार
- ‘भ्रष्टाचार संपवणं ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा’
- जनतेचा सेवक असल्याने जागा हडप करणाऱ्यांना माफ करणार नाही- लहू कानडे


